चेन्नई, ३ ऑक्टोबर २०२४ – रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (रिफेक्स) या राख आणि कोळसा हाताळणी, तसेच इलेक्ट्रिक वाहन (व्ही) मोबिलिटीसारख्या विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपनीने इक्विटी आणि कन्व्हर्टिबल वॉरंट्सच्या प्रेफरन्शियल इश्यूजच्या माध्यमातून ९२७.८१ कोटी रुपयांचा निधी ‘प्रमोटर’ व ‘नॉन-प्रमोटर’ विभागात उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे .https://sindhudurgsamachar.in/maharashtra-वांद्रे-उपनगर-जिल्हाधि/
या लक्षणीय निधी उभारणी उपक्रमाद्वारे रेफेक्सची विविध व्यवसायांतील शाश्वतता आणि नावीन्याशी असलेली बांधिलकी अधोरेखित होत आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये ● एकूण वितरण : ९२७.८१ कोटी रुपये – हाय-नेट वर्थ इंडिव्हिज्वल्स (एचएनआय) आणि कौटुंबिक कार्यालयांच्या ५३० कोटी रुपयांचा समावेश.● प्रमोटर्सचे योगदान – प्रमोटर समूहातर्फे ३७२ कोटी रुपयांचा प्रस्ताव – ३७२ कोटी रुपये आणि श्री. दिनेश कुमार अगरवाल, समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अंदाजे २६ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्याद्वारे नेतृत्वगटाची दमदार बांधिलकी दिसून येत आहे.● सल्लागार पाठिंबा – या यशस्वी वितरणासाठी मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडने (एमएनसीएल) बँकर आणि सल्लागार म्हणून काम पाहिले. हा निधी धोरणात्मक पद्धतीने उभारला जाणार असून, तो उपकंपन्या, भांडवली खर्च, खेळत्या भांडवलाच्या गरजा, सद्य कर्जाची परतफेड आणि कॉर्पोरेट कामांसाठी वापरला जाणार आहे.
रेफेक्स कंपनीने राख व्यवस्थापन क्षेत्रातील लॉजिस्टक्समध्ये नावीन्यता आणत थर्मल पॉवर प्लांटच्या कामकाजाशी संबंधित पर्यावरणीय समस्यांवर तोडगा काढण्यासाठी योग्य संधीचा वापर करण्यासाठी निधीचा प्रस्ताव मांडला आहे. रेफेक्सने प्रवासी वाहतूक क्षेत्रात आपली उपकंपनी आणि इलेक्ट्रिक वाहन सेवेद्वारे लक्षणीय प्रगती केली आहे. ‘शाश्वततेवर असलेला भर राख हाताळणी क्षेत्रातील लॉजिस्टिक्स आणि ईव्ही मोबिलिटी क्षेत्रातील प्रयत्नांना चालना देण्यासाठी पूरक ठरत आहे,’ असे रेफेक्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले. ‘या निधीमुळे आम्हाला सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासकीय (ईएसजी) तत्त्वासंह नावीन्यपूर्ण उपाययोजना तयार करण्यासाठी ताकद मिळेल. गुंतवणूकदार आणि नेतृत्व गटाने दिलेला पाठिंबा अधिक स्वच्छ, हरित भविष्य तयार करण्याच्या आमच्या ध्येयावर विश्वास दर्शविणारा आहे.’