रेल्वेगाड्या सुरक्षितपणे चालविण्याकरिता कोकण रेल्वेद्वारे पावसाळ्यात गस्त

0
152
कोकण रेल्वे ,
चार रेल्वे स्थानकांकडून तब्बल २३ कोटींचा महसूल; कोकण रेल्वेचा विक्रमी आर्थिक टप्पा

मुंबई-:कोकण रेल्वे गाड्या पावसाळ्यात सुरक्षितपणे चालवता याव्यात, यासाठी कोकण रेल्वे आवश्‍यक ती सर्व काळजी घेणे सुरू करणार आहे. सुमारे 846 कर्मचारी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालतील.असुरक्षित ठिकाणी 24 तास गस्त घातली जाईल, 24 तास सुरक्षारक्षक तैनात केले जतील,तसेच या ठिकाणी वेगावर निर्बंध घातले जातील. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलद हालचाल करण्यासाठी, उत्खनन केलेल्या ठिकाणी बीआर एन बसविण्यात येतील.

पाणलोटाच्या जागांची साफसफाई, खोदकाम केलेल्या ठिकाणांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा कार्ये राबविली गेल्याने दरड पडण्याच्या आणि माती खचण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जात आहेत. गेल्या 9 वर्षांत पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे रेल्वेसेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही.

सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय, स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन देण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्डना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत. सिग्नल दृश्‍यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल आता एलईडीने बदलले आहेत.9 स्थानकांवर स्वतः नोंदणी करु शकतील असे,पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत, हे माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या प्रदेशातील पावसाची नोंद करतील आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करतील. काळी नदी, सावित्री नदी आणि वशिष्ठी नदी याठिकाणी पाण्याचा प्रवाह धोक्‍याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करू शकतील अशी पूराची सूचना देणारी चेतावणी प्रणाली बसवण्यात आली आहे.
बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष, गाड्या सुरक्षितपणे चालवण्यासाठी पावसाळ्यात 24 तास काम करतील. हे पावसाळी वेळापत्रक 10 जून 2022 पासून 31 ऑक्‍टोबर 2022 पर्यंत लागू असेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here