रेल्वेचा मोठा निर्णय; आता प्रवाशांना थेट कन्फर्म तिकीट मिळणार

0
107

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

मुंबई- रेल्वे प्रवास म्हटला तर तिकीट आलचं आणि तिकीट म्हटलं तर वेटींगलिस्ट आलीच, मात्र आता हे समीकरण बदलणार आहे. कारण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता वेटींगलिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांना ताटकळत न राहता थेट कन्फर्म तिकीट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा याचा फायदा होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू संपवून तुम्हीही घरी जाण्याचा विचार करत असाल आणि ट्रेनमध्ये थांबून त्रास देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर तुम्हाला रेल्वे तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

उत्तर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रेनमधील वेटींगलिस्ट कमी करण्यासाठी रेल्वेने 21 रेल्वे गाड्यांमध्ये कायमस्वरूपी डबे जोडण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये थर्ड एसी व्यतिरिक्त सेकंड एसी आणि सेकंड चेअर कार कोचची व्यवस्था करण्यात येत आहे. लांबलचक प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याची उत्तर पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते कॅप्टन शशी किरण यांनी दिली.

प्रवाशांना फायदा
राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, ओडिशा या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यांना आता थेट कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here