लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित श्रेणीचं निश्चित झालेलं आरक्षित तिकीट रद्द केल्यास आता त्यावर काही टक्के रक्कम कापून घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे . निश्चित झालेलं आरक्षित तिकीट रद्द करताना रेल्वे काही टक्के रक्कम रेल्वे जीएसटीमधून कापून घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे.
नियमांनुसार कन्फर्म तिकीट रेल्वे निघण्याच्या 48 तासांच्या आत रद्द करता येते. त्यासाठी AC First Class वर 240 रुपये, AC 2 tier वर 200 रुपये, AC 3 tier आणि Chair Car वर 180 रुपये, Sleeper class वर 120 रुपये आणि द्वितीय श्रेणी वर 60 रुपये असा भार आकारला जातो.रेल्वे सुटण्याच्या 12 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तिकीट दराच्या 25 टक्के रक्कम तिकिटातून कापली जाते जातं. तर 4 तासांच्या तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या रकमेचा 50 टक्के भाग दंड स्वरुपात आकारला जातो. तर 4 तासांच्या तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या रकमेचा 50 टक्के भाग दंड स्वरुपात आकारला जातो. पण आता नवीन नियमानुसार तिकीट रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्जवर देखील जीएसटी लागणार आहे. रेल्वेच्या या नवीन निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे


