रेल्वे भाडे कोविडपूर्वीच्या दराप्रमाणेच सामान्य होणार

0
103
लोकमान्य टिळक टर्मिनस जवळील कामामुळे मध्य रेल्वेकडून तात्पुरता बदल

कोरोना महामारीने जगभरात अनेक गोष्टी बदलल्या गेल्या.आता कोरोनाचे लसीकरण आणि निर्बंध यामुळे देशभर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे.त्यामुळे देशभरात लागू झालेले कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोनाकाळात रेल्वेनेही आपल्या गाड्या बंद केल्या होत्या.कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर रेल्वे फक्त विशेष गाड्या चालवत आहे. याची सुरुवात लांब पल्ल्याच्या गाड्यांपासून झाली आणि आता ‘लोकांना टाळता येण्याजोग्या प्रवासापासून परावृत्त’ करण्यासाठी ‘किंचित जास्त भाडे’ विशेष गाड्या म्हणून सध्या लहान पल्ल्याच्या प्रवासी सेवा चालवल्या जात आहेत. या विशेष ट्रेनमध्ये प्रवाशांना सामान्य गाड्यांपेक्षा 30 टक्के जास्त भाडे द्यावे लागते.

रेल्वे बोर्डाने शुक्रवारी विभागीय रेल्वेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की गाड्या आता त्यांच्या नियमित क्रमांकासह चालवल्या जातील आणि भाडे कोविडपूर्वीच्या दराप्रमाणेच सामान्य असेल.आता ट्रेनमधून विशेष दर्जा हटवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here