लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणारी लष्कराची बस नदीत कोसळल्यामुळे 7 जवानांचा मृत्यू

0
29

लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणारी लष्कराची बस नदीत कोसळल्यामुळे 7 जवानांचा मृत्यू ‘झाल्याचे वृत्त आहे. लडाखमध्ये थॉईसपासून 25 किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात लष्कराच्या 7 जवानांचा मृत्यू झाला तर अनेक जवान जखमी झाले आहेत. लष्कराची बस 50-60 फूट खोलवर श्योक नदीत कोसळली.जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे.

बसमध्ये 26 जवान प्रवास करत होते. यापैकी 7 जवानांचा मृत्यू झाला तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीसाठी लेह येथून तज्ज्ञांचे एक पथक परतापूरला पाठवण्यात येत आहे. तूर्त, गंभीर जवानांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे.

‘लडाखमधील बस दुर्घटनेने दु:ख झाले, त्यात आपण लष्कराचे अनेक शूर सैनिक गमावले. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावे ही कामना. या अपघातातील पीडित जवान व त्यांच्या कुटुंबियांना सर्वोतपरी मदत केली जाईल.’असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here