देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण आलेले आहे. आता तज्ञांकडून कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग ण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मुलांना नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत संशोधन होत आहे.
डब्ल्यूएचओचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मुलांना नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आजच दावा केला. मुलांना नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलची टेस्टिंग सुरू आहे. मात्र ही लस चालू वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही.कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एक नाकाची लस ही रेस्पिरेटरी पॅसेजमधील संक्रमणाच्या जागेवर इम्युनिटी पॉवर उत्पन्न करण्यास सक्षम आहे. लहान मुलांच्या संक्रमणाच्या बाबतीत कोरोना संसर्ग आणि ट्रान्समिशन दोन्ही रोखण्यासाठी आवश्यक आहे.
या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणीदरम्यान यशस्वी झाल्याची माहिती मिळाली होती. नाकाच्या लसीनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची चाचणी चालू आहे.