लाच देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असल्याचे पत्रक वाटून जनजागृती मोहीमेस प्रारंभ

0
207

सिंधुदुर्ग ं लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा असल्याने याविषयी जनमानसात जनजागृतीसाठी अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग मार्फत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रक वाटून जनजागृतीस प्रारंभ झालाआहे

या पत्रकात कुणी शासकीय अधिकारी कर्मचारी, सरकारी कामकाजासाठी शासकीय फि व्यतिरिक्त जास्त रकमेची पैशाची मागणी करीत असल्यास अथवा अवैध मार्गाने मालमत्तेची मागणी करित असल्यास किंवा कोणतीही व्यक्ती लाच देण्याचा प्रयन्न करीत असल्यास ,टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा मोबाईल ॲप्सव्दारे तक्रार नोंद करू शकता .

यासाठी www.acbmaharashtra.net या साईटवर मराठी, इंग्रजी मध्ये माहीती उपल्ब्ध आहे किंवा पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग, जुने जिल्हाधिकारी कार्यालय नवीन तहसीलदार कार्यालयासमोर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील कार्यालयाच्या ०२३६२ – २२२२८९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला तसेच पोलीस उपअधीक्षक श्री दीपक कांबळे यांच्या मार्फत सिंधुदुर्ग वासियांना आवाहन करण्यात आले आहे .अधिक माहीती साठी श्रीमती आसमा मुल्ला पोलीस निरीक्षक मो. नं.९२८४ ९६६१२५ श्री दीपक कांबळे पोलीस उपअधीक्षक मो.नं.९८९००७९२०८ यावर संपर्क साधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here