लालबागचा राजा मुंबईकरांचे श्रद्धास्थान! यावर्षी एक नवा बदल लालबागच्या राजामध्ये घडवून आणला आहे.लालबागचा राजा हा सर्वात मोठा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे .या मूर्तीची उंची १८ फुटाची असते. पण यावर्षी मूर्ती ४ फूट उंचीची बनविण्यात आली आहे.त्यामुळे या नव्या मूर्तीसाठी दागिनेही नवे बनविण्यात आले आहेत.लालबागचा राजाला सोन्याच्या दागिन्यांचा साजशृंगार असतो.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळामार्फत भाविकांना ऑनलाईन दर्शन मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे ज्या भाविकांना देणगी द्यायची आहे त्यांच्यासाठी जीओ मनी, पेटीएमसारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.


