सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘तिन्ही सांज’, ‘वेलकम जिंदगी’ अशा नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि जावई असा परिवार आहे.
दहा दिवसांपूर्वीच म्हणजे 19 एप्रिल रोजी शेखर ताम्हाणे यांच्या पत्नी उमा यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.शेखर ताम्हाणे यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.