मुंबई- ठाकरे सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली, तेव्हापासून भाजप त्यावर हल्लाबोल करत आहे.राज्य सरकार आणि विरोधाकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे
“वाईनला दारु मानली जाते की नाही हे मला माहीत नाही, पण ते कृषी उत्पादनापासून बनवले जाते. त्याच्या विक्रीतून शेतकरी अधिक कमाई करू शकतात. जे विरोध करत आहेत ते शेतकरी विरोधी आहेत.नियमांनुसार, राज्य सरकार 1,000 स्क्वेअर फूट किंवा त्याहून अधिक आकाराच्या सुपरमार्केट आणि दुकानांमध्ये परवाना शुल्क भरून वाईन विकू शकते, परंतु विक्रीसाठी तयार केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. वाईनची विक्री वाढली तर त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल. भाजपचा विरोध आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वाईन विक्रीबाबत आम्ही हे पाऊल उचलले आहे.
साध्वी प्रज्ञा यांनी 20 जानेवारीला सांगितले होते की, मर्यादित प्रमाणात दारूचे सेवन हे औषधाचे काम करते आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते विष असते. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा म्हणतात की, दारू हे औषध आहे कमी प्रमाणात घेतली तर ते औषध असते असेही संजय राऊत म्हणाले.


