आठवी पर्यंतच्या इयत्तेची पाठ्यपुस्तके वैभववाडीत दाखल
मंदार चोरगे / वैभववाडी
संपूर्ण राज्यात गेल्या दिड दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. दरवर्षी शासनामार्फत इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत. मात्र कोरोनाच्या काळात खेड्यापाड्यातील विद्यार्थी पाठ्यपुस्तकावीना वंचित राहिल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरापासून शालेय शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला आहे. सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने अध्यापन – अध्ययनाचे कार्य सुरू आहे.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकावीना अध्यापनात अडथळा येऊ नये म्हणून बऱ्याच शाळांनी शालेय स्तरावर इयत्तावार जुनी विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके जमा करून सदर पाठ्यपुस्तकांचे वितरण करुन विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले आहे. आज सकाळी वैभववाडी पं.स.शिक्षण विभागाकडे नविन पाठ्यपुस्तके दाखल झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी- पालक व शिक्षक वर्गाची पाठ्यपुस्तकांची प्रतिक्षा संपली असुन लवकरच तालुक्यातील शाळांच्या पटसंख्ये नुसार सदरची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत.
यावेळी गजाजन परीट व्यवस्थापक एस टी महामंडळ कोल्हापूर,विस्तार अधिकारी अशोक वडर विशेष शिक्षक संतोष चामलवाड ,विशेष तज्ञ महेश प्रभावळकर ,अंकुश जाधव, माने आदी कर्मचारी उपस्थित होते.