विधानसभा विधेयकांबाबत सुधारणा, सूचना पाठविण्याचे आवाहन

0
74

सिंधुदुर्ग – संसदेने मंजूर केलेल्या केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा अधिनियम) 2020 या अधिनियमासंबंधीच्या राज्या शासनाच्या अत्यावश्यक वस्तू ( महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2021 या विधेयकाचा मसूदा लोकाभिप्राय अजमावण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या www.mis.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 – शेतकरी ( सक्षमीकरण व संरक्षण ) आश्वासित मूल्य व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा ) विधेयक, 2021, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 – शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण ) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021 व सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 -अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021 या विधेयकांबाबत ज्या व्यक्ती सुधारणा, सूचना पाठवू इच्छितात त्यांनी त्यांच्या सूचना, सुधारणा तीन प्रतींमध्ये निवेदनाच्या स्वरुपात पाठवाव्यात.

संबंधित सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.

सूचना पाठविण्याचा पत्ता राजेंद्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – 400032 यांच्याकडे किंवा [email protected] या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन राजेंद्र भागवत, प्रधआन सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here