विराट कोहलीची टी -20 फॉर्मेटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा

0
74

विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने कर्णधारपद सोडण्याच्या आपल्या निर्णयाची माहिती दिली.कोहलीने गुरुवारी टी -20 विश्वचषकानंतर आपण या स्वरूपाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे असे एक पत्र ट्विट करून जाहीर केले होते.

‘भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली असे नाही, तर माझ्या कर्तृत्वाच्या बळावर कर्णधारपद मिळवण्याचे भाग्य मला लाभले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. संघातील खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, निवड समिती, प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय आमच्या विजयासाठी प्रार्थना केल्याशिवाय मी हे करू शकलो नसतो.टी -20 चा कर्णधार म्हणून मी माझे सर्वस्व संघाला दिले आहे. मी एक फलंदाज म्हणून पुढेही टी 20 संघासाठी माझे योगदान देत राहीन. रवी भाई, रोहित आणि माझे जवळचे मित्र, संघ नेतृत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग यांच्याशी दीर्घ चर्चा केल्यानंतर मी टी -20 विश्वचषकानंतर या स्वरूपाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. मी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि सर्व निवडकर्त्यांशी याबद्दल बोललो आहे. 

आता यासाठी रोहित शर्माचे नाव कर्णधारपदासाठी घेतले जात आहे.रोहितने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here