वेंगुर्ल्यात १३ ऑगस्ट रोजी लोकअदालतीचे आयोजन

0
123

वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर

तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

    उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांना कमीत कमी वेळांत, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करुन वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला (दुरध्वनी क्रमांक ०२३६६-२६२७०७) येथे संफ साधावा.

    ज्या पक्षकरांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायतकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत असे आवाहन वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश तथा  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष के.के.पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here