वैद्यकीय क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0
50

कोविडनंतर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेप्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटकर यांनी आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु यांनी येणाऱ्या काळात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे वेगवेगळे प्रकल्प, भविष्यात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि कोविडनंतर वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम यासंदर्भात चर्चा केली. लवकरच विद्यापीठामार्फत भविष्यकालीन आराखडा सादर करण्यात येईल,असेही डॉ. कानेटकर यांनी यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here