वैभववाडी जवळ लक्झरी बस जळुन खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवितहानी टळली

0
78

वैभववाडी प्रतिनिधी
पुण्याहून गोव्याकडे जाणारी लक्झरी बस वैभववाडी येथील एडगाव – पाष्टेवाडी नजिक आल्या नंतर तिने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वा. घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे लक्झरी बस मधील ३७ प्रवाशांना सुखरूप बाहेर पडले. यावेळी एक वयोवृद्ध महिला जखमी झाली.प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ येऊ लागले. व बसने मोठा पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली. दरम्यान महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व आग विझवण्यात आली. या घटनेनंतर एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here