आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट ‘व्हिक्टोरिया’ या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे या चित्रपटातुन दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. नुकताच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे.