व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील 20 लाखांहून अधिक वापरकर्त्यांची खाती केली बंद

0
115

व्हॉट्सअ‍ॅपने ऑगस्टमध्ये भारतातील 20 लाखांहून अधिक वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत. भारताच्या आयटी नियमांचे आणि व्हॉट्सअ‍ॅप सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर ही कारवाई करण्यात आली.

भारत सरकारने 26 मे रोजी नवीन आयटी नियम लागू केले होते. या नियमांनुसार, 50 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेले कोणतेही डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्येक महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे. या अहवालात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यांच्या आधारे केलेल्या कारवाईची माहिती द्यावी लागेल.व्हॉट्सअॅपने भारतात 16 जून ते 31 जुलैपर्यंत 3 लाख खाती बंद केली होती. 594 तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जगभरात सरासरी 8 कोटी खात्यांवर व्हॉट्सअ‍ॅप बंदी घालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here