राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केले आहे.तोंडातील अल्सरसंदर्भात शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. शरद पवार यांची तब्येत चांगली आहे. ते रुग्णालयात विश्रांती घेत असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे.