प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
शिरगाव: एस.एस.सी.बोर्ड शिरगावच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर येताना एस.टी.बस चुकल्यास रिक्षा चालक-मालक संघटना शिरगाव यांच्याकडून अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर येण्यासाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/ratnagiti-राजापुरात-बिबट्याचा-हल/
महाराष्ट्रात दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु झाली आहे. गावागावातील विध्यार्थी परीक्षाकेंद्रावर जाण्यासाठी घाई घाईत निघत असतात. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना एस टी किंवा इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत असतो. परीक्षेला जाण्याची घाई आणि परीक्षेचा ताण यामुळे विद्यार्थी गोंधळलेला असतो आणि त्यातच परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचणे पण आवश्यक असते. हाच गोंधळ लक्षात घेऊन अनेक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.
संबंधित विद्यार्थी / पालकांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
तारक चव्हाण 9921381812
भाई तावडे 9637083103
महेश ओंबळकर 9527765501
संतोष जंगले 9420305264
राजेंद्र पोकळे 9764422505
सदाशिव चव्हाण 9403350370
प्रकाश किंजवडेकर 9423610184
राजेंद्र चव्हाण 9764109330
दिलीप राणे 9404439986
महेश शिरगांवकर 9307362501
अरुण पवार 9404441201
रवींद्र साटम 9420974091
शरद साटम 9823656011
विलास चौकेकर 8275831982

