शिवगंगा नदीकाठच्या देवघर धरणाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
170

सिंधुदुर्ग– भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनूसार जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदीपात्रात येऊन नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी झाल्यास धरणामध्ये पूर्ण संचय पातळीपर्यंत कोणत्याहीक्षणी पाणीसाठा निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतर धरण सुरक्षेततेच्या दृष्टीने अतिरिक्त येणारे पाणी धरणातून नदीपात्रात सोडणे भाग आहे. तरी नदीकाठच्या लोकांनी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बागळावी असे आवाहन, सं.ना. तळेकर, उपकार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल-कुडाळ यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here