माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
प्रतिनिधी: पांडुशेठ साटम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कसाल शहरप्रमुख पदी कृष्णा उर्फ नंदू जगन्नाथ आंबेरकर व कसाल उपशहरप्रमुख पदी स्वप्नील गंगाराम मोडक यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-खड्डेमय-झालेल्या-कुडाळ-म/
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर,अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, सुरेश नांदिवडेकर, काशीराम नांदिवडेकर,गणेश मेस्त्री, एन. डी. सावंत, भिवा नांदिवडेकर, बाळा नांदिवडेकर, गिरीश मर्तल, गोविंद नांदिवडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते


