मुबंई- राज्यातील सत्तासंघर्षावर, आमदार, अपात्रता आणि खरी शिवसेा कोणाची, या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात आज ( २७ सप्टेंबर ) सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून, उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. त्यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“शिवसेना पक्ष कुणाची जहागीर नाही आहे. दोन तृतीअंश बहुमत आमच्याकडे आहेत. शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोग घेणार, हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. परंतु, चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये सहानभुती मिळवण्यासाठी कारणे सांगून, सर्वोच्च न्यायालयाचा आधार ‘मातोश्री’ने घेतला आहे. न्यायालयाने मोठी चपराक उद्धव ठाकरेंना दिली आहे. अखेर विजय सत्याचाच होणार. नवरात्रात देवीने दिलेला हा प्रसाद समजेल, असे नरेश मस्के यांनी म्हणाले.
Home महाराष्ट्र “शिवसेना पक्ष कुणाची जहागीर नाही”; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया


