शिवसेनीची पडझड;मुख्यमंत्री मातोश्रीवर !

0
26

मुंबई: काल दिवसभरात राज्यात आलेल्या राजकीय भूकंपामुळे राज्यातील वातावरण अस्थिर झाले आहे . राज्यातील महाविकास आघाडी सरकार आता निश्चितच पडणार आहे असे दिसत आहे.त्यातच गेल्या 12 तासांमध्ये शिवसेनेचे आणखी पाच आमदार आणि दोन अपक्ष आमदार गुवाहाटीला पोहोचले. यामध्ये गुलाबराव पाटील, योगेश कदम, सदा सरवणकर, योगेश पवार, मंगेश कुंडळकर यांचा समावेश आहे. उर्वरित दोन आमदार मंजुळा गावित आणि चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असे ट्विट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर दुसरीकडे मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेखही हटवला आहे.

आज राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी अकरा वाजता मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 11.30 वाजता पक्षाच्या बड्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे 19 पैकी 9 खासदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि नागपूरचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हे गुवाहाटीला दाखल झाले आहेत. सत्ता परिवर्तन होताच आणखी अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरणार आहे

राजकीय स्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक हाकही मारली आणि रात्रीच मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ मधून बाहेर पडून ‘मातोश्री’वर पोहोचले. याठिकाणी शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे देशद्रोहीच्या घोषणाही देण्यात आल्या.उद्धव ठाकरे यांनी कारमधून उतरुन त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवाद केले आणि त्यांचेही अभिवादन स्विकारले. त्यानंतर ते गाडीत बसले असून पुढे निघाले.भावनिक फेसबुक लाइव्हनंतर त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण आदी नेते वर्षा निवासस्थानावर गेले. त्यावेळी तेथे संजय राऊतही होते. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा कोणताही सल्ला दिलेला नाही. उलट ही लढाई शेवटपर्यंत लढायची आणि जिंकायची आहे हे आम्ही ठरवलेले आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार भागवत कराड देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर बाहेर आले. त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडावर ​​​​​​दानवे म्हणाले की, आमची एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडी सरकार आपापसात भांडत आहे. आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही. सरकार पाडण्यासाठी ते स्वबळावर लढतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर पोहचले परंतू तेथे मोठी गर्दी असल्याने त्यांच्या गाड्यांचा ताफा पुढे जाऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांना सर्व अभिवादन करण्यासाठी जमल्याने मुख्यमंत्री कारमधून बाहेर आले आणि त्यांनी सर्वांना अभिवादन केले यासोबतच आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या खास शैलीत अभिवादन केले. यानंतर मुख्यमंत्री पायीच मातोश्रीकडे निघाले. मुख्यमंत्री पदावर असताना सरकारी निवासस्थान सोडून स्वगृही परतणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला गर्दी जमणे हे अभुतपुर्व दृश्य होते. वर्षा निवासस्थानावरुन निघल्यानंतर मुख्यमंत्री वरळी येथे पोहचले तेव्हा त्यांनी गाडीतून उतरुन जनतेला या अभिवादन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून कौतुक. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाने त्यांच्याबद्दलचा आदर वाढल्याची भावना वाढली .महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेचे 3 आमदार गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आमदारच नाही तर शिवसेनेच्या अनेक खासदारांनीही शिंदेंकडे जाण्याची तयारी केली असल्याची माहिती विविध माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.शिवसेनेचे आणखी काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होण्यासाठी गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याची चर्चा सुरू आहे.आमदार निर्मला गावित, योगेश कदम, गोपाळ दळवी यांना घेऊन भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरत विमानतळावर पोहोचले आहेत. ते हॉटेल मेरिडियन येथून विमानतळावर पोहोचले आहेत आणि तेथून गोठी चार्टर विमानाने गुवाहटीला पोहचणार असल्याचे समजते.शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रमुख पदावरून सुनील प्रभू यांची उचलबांगडी करून भरत गोगावले यांची निवड केली आहे.

शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे श्री. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत. त्यामुळे हा व्हीप बेकायदेशीर आहे. याशिवाय त्यांनी सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली. म्हणजेच आता शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा ठोकला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटीत सध्या शिवसेनेच्या 33 आमदारांसह अपक्षासह एकूण 35 आमदार असल्याचे समजते.शिंदे यांना अजून 4 आमदारांचे पाठबळ हवे आहे. त्यापैकी 2 आमदार गुवाहटीत पोहचले आहेत. 2 आमदार मुंबईतून निघालेत.गुवाहतील प्रत्येक बंडखोर आमदारांकडून ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र घेतले आहे .आज संध्याकाळपर्यंत 50 आमदार ठाकरे सरकारविरोधात जाण्याची शक्यता आहे .शिंदे समर्थक आमदारांची गुवाहटीत बैठक होणार असून त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून निवडणार असण्याचे वृत्त हाती आले आहे. सिंधुदुर्गचे दिपक केसरकर एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याचेही वृत्त आहे

भाजपमध्ये सध्या वेट अँड वॉच अशी स्थिती आहे. मुंबईतील विविध भागात भाजप नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आतापर्यंत असलेले साथीदार अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद शंभुराज देसाई – पाटण, सातारा संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद,भरत गोगावले – महाड, रायगड,नितीन देशमुख – बाळापूर, अकोला,अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली,विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम,लता सोनवणे- चाेपडा,संजय गायकवाड – बुलडाणा,संजय रायमूलकर – मेहकर,महेश शिंदे – कोरेगाव, सातारा,शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर,प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर,15 संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ,ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद,तानाजी सावंत – परंडा, उस्मानाबाद,संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम,रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद,श्रीनिवास वनगा, पालघर,बालाजी कल्याणकर -नांदेड,बालाजी किणीकर- अंबरनाथ,सुहास कांदे -नांदगाव,महेंद्र दळवी- अलिबाग,प्रकाश सुर्वे -मागाठणे,महेंद्र थोरवे -कर्जत,शांताराम मोरे -भिवंडी28.किशोर पाटील- पाचोरा,चिमणराव पाटील- एरंडोल,प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद,सिंधुदुर्ग दिपक केसरकर.

ठाकरेंच्या संपर्कातील यांच्या बरोबर आतापर्यंत असलेले साथीदार वैभव नाईक,उदयसिंह राजपूत,रवींद्र वायकर,राहुल पाटील,उदय सामंत,प्रकाश फातर्पेकर,सुनील प्रभू,गुलाब पाटील,भास्कर जाधव,संतोष बांगर,आदित्य ठाकरे,राजन साळवी,अजय चौधरी,दिलीप लांडे,सदा सरवणकर,दादा भुसे,संजय पोतनीस,सुनील राऊत, कैलास पाटील,दीपक केसरकर,यामिनी जाधव,रमेश कोरगावकर,योगेश कदम,मंगेश कुडाळकर, प्रताप सरनाईक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here