देशात कोरोनाच्या संसर्गाचा ७ दिवसांचा सरासरी दर ६.६ % वर आला आहे, तो एक महिन्यापूर्वी ६ मे रोजी २६ % पर्यंत पोहोचला होता. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या ६१ दिवसांत १.५६ कोटी रुग्ण आढळले आहेत. २२ राज्यांत कोरोना संसर्गाचा दर ५% पेक्षा खाली गेला आहे.
संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेत संसर्गाचा दर खाली होण्यासाठी १०० दिवस लागले होते. त्या हिशेबाने भारताला दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेपक्षा ३९ दिवस कमी लागले. भारतात आता तिसऱ्या लाटेचा धोका आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या मते, मास्क, सहा फूट अंतर आणि जास्तीत जास्त लसीकरणातून तिसरी लाट रोखली जाऊ शकते.
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रात या ५ राज्यांत कोरोना संसर्गाचे ७५% नवे रुग्ण आढळत आहेत. याशिवाय सर्व राज्यांत नवे रुग्ण १० हजारांपेक्षा कमी आले असले तरीही रोजच्या मृत्यूची संख्या २५०० च्या वर कायम आहे.