कोलंबो : श्रीलंकन नौदलाने आज तामिळनाडू आणि कराईकलमधील ३५ मच्छीमारांना अटक केली आहे. हे मच्छीमार आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडून मासेमारी करत असल्याच्या आरोपावरून पकडले गेले. https://sindhudurgsamachar.in/पेडल-फॉर-प्लॅनेट-सायकल/
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांना कंकेसनथुरई नौदल तळावर चौकशीसाठी नेण्यात आले, त्यानंतर त्यांना जाफना येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
हे सर्व मच्छीमार तीन यांत्रिक नौका आणि एक पारंपरिक होडी घेऊन समुद्रात उतरले होते, मात्र त्या सर्व नौका श्रीलंकन अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत.


