रत्नागिरी: सामाजिक,कला,क्रीडा, आरोग्य,शैक्षणिक,पत्रकारीता,सांस्कृतिक,बचत गट,पर्यावरण,आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे व्यक्तीस व संस्थेला दरवर्षी नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी, रत्नागिरी या शासन मान्यता प्राप्त संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.
समाजात अनेक लोक आप-आपल्या परीने समाजासाठी काम करत असतात.त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित सन्मान व सत्कार केला जातो. दरवर्षी संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीना देण्यात येतात या वर्षी १६५ व्यक्ती मधून २२ व्यक्तीना पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वानिवडे गावचे सुपुत्र श्री.श्रीविद्या सदाशिव सरवणकर याना यावर्षीचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार नुकताच आमदार शेखर निकम यांच्या हस्ते देण्यात आला या वेळी उद्योजक किरण सामंत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होते श्रीविद्या सरवणकर याना आता पर्यंत वेगवेगळ्या संस्थाकडून दहा पुरस्कार मिळाले आहेत श्री.श्रीविद्या सरवणकर हे ईश्वर सेवा ट्रस्ट मार्फत सामाजिक कार्य करत असून डोंबिवली ब्लड बँक,डोंबिवली चे संचालक आहेत त्यांनी कोविड काळातही मोठया प्रमाणात सामाजिक बांधिलकी जपून कार्य केले तरी त्यांचे वेगवेगळ्या स्तरातून अभिनंदन केले जात आहे..