संजय राऊत यांच्यावर ईडीची थेट कारवाई

0
65

राज्यात राजकीय भूकंप झाला आणि रोजचा दिवस राजकारणात लक्षवेधी वळण घेत आहेत. ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांच्यावरील ईडीची थेट कारवाई हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती.ईडीने संजय राऊत यांना मुंबईतील ईडीच्या कार्यालयात उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

यानंतर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये लिहिताना त्यांनी,’मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. कितीही कारवी झाली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही …या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे लिहीत संजय राऊत यांनी हे ट्विट थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here