कुडाळ- संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर मराठी ,हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधून आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण. स्पर्धकांनी सहभाग घेतला. मराठी,इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषेतील प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांकांचे निबंध निवडण्यात आले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-
मराठी निबंध-
प्रथम क्रमांक – दीपाली अनंत विशे,टी.वाय.बी.एस्सी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, किन्हवली,ठाणे 421403
द्वितीय क्रमांक – सत्यवान बुधाजी कदम,एस. वाय.एल.एल.बी.व्हिक्टर डान्टस लाॅ काॅलेज,कुडाळ,सिंधुदुर्ग
तृतीय क्रमांक- योगिनी नीतीन मराठे,श्री.पंचम खेमराज लाॅ काॅलेज,सावंतवाडी,
हिंदी निबंध
प्रथम क्रमांक – अमिषा अर्जुन गावडे,एस.वाय.बीएस्सी,संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ द्वितीय क्रमांक – सानिका टेमकर, बी.एन.बांदोडकर महाविद्यालय, ठाणे
तृतीय क्रमांक -सौरभ इंद्रेश सिंग,बी.एन.बांदोडकर महाविद्यालय, ठाणे
इंग्रजी निबंध – प्रथम क्रमांक -मीनाक्षी बाळासाहेब राणे,प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालय, साळगाव, कुडाळ द्वितीय क्रमांक -अमिना मुबारक खान , एसवाय.बी.काॅम ,संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ तृतीय क्रमांक -मैथिली भालचंद्र हळदणकर, टी.वाय.बीएमएस ,संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ.
या स्पर्धेचे परीक्षण कॅप्प्टन डॉ. एस टी आवटे, डॉ.बी. ए. तुपेरे प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. या स्पर्धेचे संयोजन महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर शरयू आसोलकर यांनी केले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.डी. डिसले यांनी अभिनंदन केले आहे.


