संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये  मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू

0
9
संत राऊळ महाराज महाविद्यालय,
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये  मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू

पुणे l

मराठीच्या संवर्धनासाठी मोडी लिपी शिकणे आवश्यक आहे, काळाच्या ओघात मोडी कडे दुर्लक्ष झाले आहे. नव्या पिढीने मोडी आत्मसात करून मराठी भाषा, संस्कृती, इतिहास यांच्या विषयीची माहिती समजून घेऊन ती जतन करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणेचे कार्यवाह श्री.सुधीर थोरात यांनी येथे केले.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने त्यांचे ‘अस्सल संदर्भ साधनांचे इतिहास संशोधनात महत्त्व’ या विषयावर व्याख्यान संपन्न  झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे होत्या. प्रशिक्षक आणि मोडी लिपीतील हेमाद्री त्रैमासिकाचे संपादक श्री.पंकज भोसले, कोकण इतिहास संशोधन परिषद, शाखा सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री.रणजीत हिर्लेकर , श्री.भूषण साटम उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता  सुरवसे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी प्रशिक्षक श्री. पंकज भोसले यांनी मोडी लिपीचा परिचय आणि प्रारंभिक अभ्यास या विषयावर मार्गदर्शन केले. हा वर्ग ऑनलाईन पद्धतीने आठवड्याला एक तासिका याप्रमाणे एकूण १५ तासिका मध्ये घेतला जाणार आहे सत्राच्या शेवटी परीक्षा घेऊन सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी श्री.रेगे, संपदा राणे, मराठी भाषा, इतिहास प्रेमी तसेच प्रशिक्षणार्थी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. शरयू असोलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष  वालावलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here