सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर ही जोडी आता एका वेगळ्या आणि धमाल वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे.येत्या 6 मे पासून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर’पेट पुराण’ मधुन भेटीस येत आहे.
सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर हे जोडपं बाळाचे पालन-पोषण जमणार नाही म्हणून प्राणी पाळायचे ठरवतात आणि मग त्यांच्या आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात, याचे चित्रण या वेब सिरिजमध्ये करण्यात आले आहे.पेट पुराण’ची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे