समाजाच्या सृद्दुढ आरोग्यासाठी स्त्रीशक्तीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज
मासिक पाळीतील काळजी ही महत्त्वाची
-डॉ. एच. एस. सावंत
कणकवली:- दि, ११- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांना उद्भवणारे ४२ टक्के आजार मासिक पाळीच्या दरम्यान आजही वापरात असलेल्या निकृष्ट दर्जा हीन प्लॅस्टिक मिश्रित कापडाच्या सॅनिटरी पॅड मुळे उद्भवतात. हे आजार भविष्यात टाळायचे असतील तर १०० टक्के कापसापासून तयार केलेले आणि विषाणू मारक निगेटिव्ह आयन युक्त नारी केअर सॅनिटरी पॅडचा वापर महिलांनी करणे हे अनिवार्य आहे. समाजाच्या भावी सुद्धुड आरोग्यासाठी आता स्त्रीशक्तीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे, असा स्पष्ट स्पष्ट सल्ला शतायुषी आयन शतायू वर्धानम फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ. एच. एस. सावंत यांनी फोंडाघाट न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये दिला.

छायाचित्र ओळी:-
१) स्धयंम चलित यंत्रांचे उदघाटन करताना भाई चव्हाण आणि मान्यवर
२) मार्गदर्शन करताना डॉ. एच. एस. सावंत आणि मान्यवर
३) स्धयंम चलित यंत्रातून पॅड काढताना विद्यार्थीनीसह मान्यवर
४) चर्चेमध्ये अनुभव कथन करताना प्रशाळेच्या शिक्षिकांसह मान्यवर
फौंडेशनच्या वतीने “स्वस्थ नारी सुखी कुटुंब” या उपक्रमांतर्गत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि महाविद्यालयांतील शिक्षकांसह विद्यार्थींनींना नारी केअरचे दर्जेदार सॅनिटरी पॅड शाळेतच दैनंदिनी उपलब्ध व्हावेत, या द्रुष्टीने जिल्हात प्रथमच स्वयंचलित (व्हेन्डर) यंत्र आणि पॅडांची विल्हेवाट लावणारे भुकटी यंत्र (स्क्रॅच) बसविण्यात आले. या दोन्ही यंत्रांचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते गणपत तथा भाई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ, सावंत बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक प्रसाद पारकर, शिक्षण संस्थेचे संचालक रंजन नेरुरकर, पालक वासुदेव सामंत, फौंडेशनचे संचालक प्रविण केळुसकर, भाई चव्हाण, कुंदन पाटकर, प्रशाळेच्या शिक्षिका सर्वश्रीमती आर्या भोगले, स्नेहा रेवडेकर, साईली पवार, दीक्षा पेडणेकर, प्रतिभा बडे, साईली शिंदे, श्रावणी खांदारे, ऐश्वर्या जठार, समृद्धी गोसावी, हिरकणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली पवार, तसेच बहुसंख्य विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
त्यापैकी काही विद्यार्थिनींनी स्वयंम चलित यंत्रामध्ये रुपये १० चे नाणे टाकून ही सॅनिटरी पॅड कशी उपलब्ध होतात याचे प्रात्यक्षिकही बिनधास्तपणे करुन घेतले.
भाई चव्हाण यांनी आपण गेली अनेक वर्षें आजार होण्यापेक्षा तो होऊ नये, या द्रुष्टीने समाज प्रबोधन करीत असल्याचे सांगून ते म्हणाले, मात्र महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भात त्यांना सोसाव्या लागणार्या त्रासाबाबत आपण अज्ञभिन्न होतो. नारी केअर सॅनिटरी पॅडचे स्वदेशी संशोधक डॉ. श्रीपत भोसले यांची प्रात्यक्षिके अनुभवली. आजच्या घडीला बोकाळलेला वंध्यत्व निवारण आई. बी. एफ. फर्टिलिटी सेंटरांच्या मुळाशी महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान वापरल्या जाणार्या निकृष्ट दर्जाहिन प्लॅस्टिक मिश्रित कापडाची सॅनिटरी पॅडच बहुतांशी कारणीभूत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे एक चळवळ म्हणून आपण हे कार्य करण्याचा द्दढनिच्शय केला आहे.
चौकट
महिलांच्या सृद्दुढ आरोग्यासाठी नारी केअर ही सॅनिटरी पॅड देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पोचली पाहिजेत – सौ. आर्या भोगले यांच्यासह सहशिक्षिका
यावेळी प्रशालेच्या शिक्षिका सौ. आर्या भोगलेसह अन्य स्त्री शिक्षिकांनी फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी आम्हा शिक्षिकांना वापरण्यासाठी दिलेल्या नमूना सॅनिटरी पॅडबाबत सकारात्मक अनुभव कथन करुन अशा प्रकारची आरोग्यदायी पॅड्स या फौंडेशनने देशातील शैक्षणिक संस्थामध्ये पोहचविण्यासाठी कंबर कसली पाहिजे. केंद्र आणि राज्य शासनांंनी “स्वस्थ नारी सुखी कुटुंब” या महिला आरोग्यदायी उपक्रमाला सर्वं प्रकाराची रसद पुरवली पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद पारकर, सूत्रसंचालन संतोष जोईल, तर आभार डी. बी. फड यांनी केले.


