आपल्याला रस्त्यात अपघातानंतर वेदनेने विव्हळणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यास अगदी काहीजणांचा पुढे येतात. याला कारणआहे ती त्यानंतर पोलिसांचा मागे लागणार ससेमिरा! पोलीस आणि सरकार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करणे ही मानवतेची सेवा आहे आणि तुम्ही तसे केल्यास पोलीस तुम्हाला त्रास देणार नाहीत. असे नेहमी आवाहन करत असूनही सामान्य लोक घाबरून जखमींना रुग्णालयात नेण्यास कचरतात.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने यांनी एक अनोख्य योजनेची घोषणा केली आहे. रस्त्यातील अपघातग्रस्तांना गंभीर दुखापतीच्या तासाभरात रुग्णालयात नेणाऱ्या,त्याला त्या क्षणी मदत करणाऱ्यास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक विशेष योजना सुरू केली आहे. अपघातग्रस्तास मदत करणाऱ्या,अपघातातील जखमींना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, अशा सरकारी योजनेची माहिती मंत्रालयाने सोमवारी दिली आहे.
ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल. मंत्रालयाने सोमवारी ‘मदतनीसांना बक्षीस देण्याच्या योजने’साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव आणि परिवहन सचिवांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या योजनेचे पात्र पाठवले असल्याचे सांगितले आहे. या योजनेचा उद्देश सामान्य जनतेला आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यातील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रेरित करणे आहे. मदत करणाऱ्या व्यक्तिला रोख बक्षिसासह प्रमाणपत्रही दिले जाईल. मंत्रालयाने म्हटले की, या पुरस्काराशिवाय राष्ट्रीय स्तरावरील 10 सर्वात उदात्त मदतनीसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाईल असही म्हंटले आहे


