ठाण्यात धक्कादायक प्रकार: सरबतात गटाराचे पाणी ! मनसेकडून कारवाई
ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रस्त्याच्या कडेला सरबत विकणाऱ्या एका विक्रेत्याने ग्राहकांना देत असलेल्या सरबतामध्ये पिण्याच्या पाण्याऐवजी थेट गटाराचे पाणी वापरल्याचे समोर आले आहे. या अमानुष आणि जीवघेण्या कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हे पण वाचा ख्यातनाम हास्यकवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन ; मराठी साहित्यविश्वात शोककळा

घोडबंदर रोडवरील एव्हरेस्ट वर्ल्ड सोसायटीसमोरच्या गाडीत हा प्रकार पाहायला मिळाला. काही नागरिकांनी सरबत घेताना पाण्याच्या टाकीतील पाणी दुर्गंधीयुक्त असल्याची शंका घेतली. तत्काळ तपासणी केली असता ते पाणी गटारातून भरलेले असल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी मनसेचे घोडबंदर वॉर्ड अध्यक्ष निलेश चव्हाण पोहोचले. त्यांनी सरबत विक्रेत्याला मनसे स्टाइलबद्ध जाब विचारत कारवाई केली आणि अशा प्रकारांवर कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला.
नागरिकांनी प्रशासनाला अशा अस्वच्छ, धोकादायक आणि आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या प्रकारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.


