सर्वोसर्वा मा.शरद पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर एसटीचा संप अखेर मागे

0
50
शरद पवार
तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या काळात तुमच्या पाठिशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी; मच्छीमार महिलांना शरद पवारांचा विश्वास

मुंबई : एसटी कर्मचारी-कामगारांचा संप अखेर मागे घेण्याची घोषणा २२ संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. सह्याद्री अतिथिगृहावर सोमवारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत संघटनांच्या प्रतिनिधींची दीर्घकाळ बैठक झाली.या बैठकींनंतर अखेर गेल्या ६८ दिवसांपासून सुरू असलेला अखेर मागे घेण्यात आला.
.
निलंबन, बडतर्फ आणि सेवा समाप्ती झालेले कर्मचारी सोडून सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे कर्मचारी कामावर रुजू झाल्यास ही नोटीस मागे घेण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कोणतीही प्रमादीय कारवाई करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले.याबाबतचे परिपत्रक काढण्याचे निर्देशही अॅड.परब यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिले.

“एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था मुंबईच्या गिरणी कामगारांसारखी करायची नाही. सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सेवेत दाखल व्हावे,’ असे आवाहन कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी केले. त्याशिवाय उच्च न्यायालयात शासनात विलीनीकरणाची मागणी लावून धरणारे एड. गुणरत्ने सदावर्ते यांच्या जागी आता अॅड. सतीश पेंडसे यांची नियुक्ती केल्याचीही घोषणा गुजर यांनी केली आहे. आम्ही भानावर आलो आहोत,’ अशा शब्दांत संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

तर “ज्या संघटनांनी माझे वकीलपत्र काढले त्या संघटना बेकायदा आहेत. मी ९२ हजार कष्टकरी कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे,’ असे प्रत्युत्तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here