गणेशोत्सवाला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.सर्वचजण गणपतीचे विशेष पद्धतीने स्वागत करण्याची तयारी करत आहे. सलमान खान दरवर्षी आपल्या कुटुंबासह त्याची बहीण अर्पिताच्या घरी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला करतो. यावर्षीही सलमान खानचे कुटुंब दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत.
पण यावर्षी सलमान खान त्याच्या आगामी ‘टायगर 3′ या चित्रपटाचे शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रियामध्ये आहे.’टायगर 3’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा तिसरा भाग आहे.या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांच्यासह अभिनेता इम्रान हाश्मी याचीही महत्त्वाची भूमिका आहे.’टायगर 3’चे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत.


