कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःला वाचवायचे असेल तर कोविड लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. महाराष्ट्रात एकूण 100 दशलक्ष नागरिकांचा लसीकरण झालेले आहे.तरीही समाजात अजूनही अनेक ठिकाणी नागरिकांनी विविध गैरसमजांमुळे कोरोनाची लस घेतलेली नाही. विशेषतः मुस्लीम भागात याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.त्यामुळे सरकारने बॉलीवूडचा दबंग’ खान म्हणजेच सलमान खानची मदत घेतली आहे.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सरकारने लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार असल्याचे सांगितले.
अभिनेता सलमान खान मुस्लिम लोकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करतानाचा एक व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे. त्याने मुस्लिम लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन या व्हिडिओमधून केले आहे. सलमानने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “सरकार जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. लसीबाबत चुकीच्या गोष्टी आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत संभ्रम निर्माण होत आहे. सर्वप्रथम मी लोकांना आवाहन करू इच्छितो की कोरोना लसीबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू नका.तसेच ही लस घेऊन आपण केवळ स्वतःलाच नाही तर आपले कुटुंब, समाज आणि देशाला वाचवतो आहोत”.