‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील कलाकार आणि दिग्दर्शक वादाच्या भोव-यात

0
103

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील कलाकार आणि दिग्दर्शक वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांनी सुनील बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर यांच्यासह इतर सहकलाकार आणि दिग्दर्शकांमध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यांच्या विरोधात मानसिक छळ आणि मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार केली आहे.

” ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत सूर्या या मुख्य पात्राच्या आईची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल साकारत होत्या. त्यांनी तीन महिन्यापुर्वी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकारांवर सेटवर मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी 22 नोव्हेंबर रोजी दादर पोलिस ठाण्यात निर्मात्यांविरोधात मानसिक छळ आणि मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार केली आहे.माझे रॅगिंग करण्यात सुनील बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर यांच्यासह इतर सहकलाकार आणि दिग्दर्शकांमध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे सहभागी होते.’

या संपूर्ण प्रकरणाबाबत सुनील बर्वे म्हणाले, ‘मी मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. पण असे आजवर कधीच झाले नाही, त्यामुळे मन उद्विग्न होत आहे. माझ्यावर असे खोटे आरोप का केले जाताहेत या विचाराने त्रास होतोय. दीड वर्षांपासून त्या आमच्याबरोबर काम करत होत्या. सगळे व्यवस्थित सुरू असताना त्यांनी स्वतः मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर आम्हालाही वाईट वाटले होते. त्यांना मालिका सोडून आता तीन महिने झाले आणि अचानकपणे त्यांना असा व्हिडिओ शेअर का करावासा वाटला हे माहीत नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here