अनाथांची माय, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले.
सिंधुताई यांच्यावर महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्यावर हर्निया संबंधित शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उपाचाराला प्रतिसाद दिला. त्यानंतर पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. मात्र, आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले आणि रात्री आज रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली आहे.
सिंधुताई यांच्या निधनावर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. त्यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रासह सर्वच स्तरातून भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे. महानुभाव पंथातील असल्याने त्यांच्यावर ठोसर पागा येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.2012 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले होते.
सिंधुताईच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाज जीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

