कृषी विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत साळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन कार्यक्रम आज दि. १ जुलै २०२१ रोजी साळगाव ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जि. प. मुख्य. कार्य. अधि. प्रजित नायर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विविध प्रकारचे वृक्ष, बांबू, हळद रोपांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी जि.प. गटनेते नागेंद्र परब, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, जि. प. सदस्य रणजित देसाई,कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, गटवि