सिंधुदर्गात आजच्या कोरोनाच्या लसीकरणास उत्तम प्रतिसाद

0
99

सिंधुदुर्गनगरी दि. 29 – आज सिंधुदुर्गात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत आहे.अनेक तरुण यामध्ये मृत्यू पडत आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 59 हजार 464 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 646 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 698 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 529 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 336 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 69 हजार 666 व्यक्तींनी पहिला डोस तर 21 हजार 816 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 59 हजार 171 नागरिकांनी पहिला डोस तर 6 हजार 206 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 98 हजार 520 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 98 हजार 240 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 55 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 43 हजार 60 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 58 हजार 533 कोविशिल्ड आणि 39 हजार 987 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 98 हजार 520 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 8 हजार 60 लसी उपलब्ध असून त्यापैकी 5 हजार 340 कोविशिल्डच्या आणि 2 हजार 720 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 2 हजार 310 लसी शिल्लक असून त्यापैकी 2 हजार 160 कोविशिल्ड आणि 150 कोवॅक्सीनच्या शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here