सिंधुदुर्ग:आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरणाऱ्या प्रवाश्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्था- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
115

सिंधुदुर्ग: ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार असलेल्या देशांमधून येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी (भारत सरकारद्वारे वेळोवेळी घोषित केलेले) मुंबई विमानतळावर उतरून पुढे विमानाने प्रवास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकतील. चिपी विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाश्यांच्या तपासणीसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करुन अशा प्रवाश्यांची माहिती आरोग्य विभागास कळविण्यात यावी. अशा प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि या प्रवाश्यांची RTPCR चाचणी 2, 4 आणि 7 व्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, प्रवाशाला रुग्णालयात हलवण्यात यावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास, प्रवाशांना आणखी 7 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.

या आदेशात म्हटले आहे. कोविड -१९ विषाणूचा ओमीक्रॉन प्रकार (Variant) दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशांमध्ये आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले असून, त्या पार्श्वभूमीवर, शासनाने हवाई वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध लावलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड -१९ विषाणूच्या ओमीक्रॉन प्रकाराचा (Variant) प्रसार रोखण्यासाठी, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग, याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी खालील अटी/ निर्बंध लागू करीत आहे. या कार्यालयाकडून कोविड – १९ चा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या मार्गदर्शक सूचना, तसेच भविष्यात कोविड -१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केले जाणारे आदेश किमान निर्बंध म्हणून काम करतील. ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार असलेल्या देशांमधून येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी (भारत सरकारद्वारे वेळोवेळी घोषित केलेले) मुंबई विमानतळावर उतरून पुढे विमानाने प्रवास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकतील. तरी चिपी विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाश्यांच्या तपासणीसाठी विमानतळ प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात यावी. व विमानतळ प्राधिकरणाकडून अशा प्रवाश्यांची माहिती आरोग्य विभागास कळविण्यात यावी.

जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग यांनी विमानतळ प्राधिकरणाकडून माहिती मिळालेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी वेगळ्या पथकाची नेमणूक करावी व अशा प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि या प्रवाश्यांची RTPCR चाचणी 2, 4 आणि 7 व्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, प्रवाशाला रुग्णालयात हलवण्यात यावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास, प्रवाशांना आणखी 7 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावे. ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार असलेले देश वगळता इतर कोणत्याही देशामधून आलेल्या प्रवाश्यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर RTPCR चाचणी करणे अनिवार्य राहील आणि RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा प्रवाश्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावे. RTPCR चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात यावे.

याबाबतची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग व जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी समन्वयाने करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून महाराष्ट्र राज्याअंर्तगत विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशाकडे लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या वेळेच्या ४८ तास अगोदरचे निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल घेणे अनिवार्य राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर उतरणाऱ्या इतर राज्यांतील प्रवाशांच्या बाबतीत, प्रवासाच्या वेळेच्या 48 तास अगोदरचे निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल घेणे अनिवार्य राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here