सिंधुदुर्ग:आय.टी.आय प्रवेशासाठी पुन्हा नव्याने अर्ज भरुन प्रवेशाची संधी

0
46

सिंधुदुर्ग: प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी राज्यातील शासकीय किंवा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रीयेकरिता दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदत वाढ दिल्याने प्रवेश घेण्यासाठी ज्यांची संधी हुकलेली आहे अशा इच्छुक उमेदवारांना दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 7 नोव्हेंबर 2021 [email protected] किंवा www.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नव्याने अर्ज करावा.

तसेच ज्यांनी पूर्वी अर्ज भरलेला आहे परंतु प्रवेश मिळालेला नाही व त्यांच्या अर्जात दुरुस्ती करावयाची असेल तर त्यांना वरील कालावधीत अर्ज दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांनी गुणवत्ता यादी दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 03.00 नंतर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधिताना SMS व्दारे कळविण्यात येईल. दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत समुपदेशन फेरीस उपस्थित राहून रिक्त असलेल्या व्यवसायांसाठी प्रवेश घ्यावा.

अधिक माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण, संस्था सावंतवाडी, मु. सावंतवाडी (बाहेरचावाडा) ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्रमांक 02363-272136 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9423304735/9420910912 वर संपर्क साधावा असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here