सिंधुदुर्ग:जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, वकृत्व,निबंध लेखन स्पर्धांचे निकाल जाहीर

0
85
वक्तृत्व
वेंगुर्ल्यात २१ रोजी काव्यवाचन स्पर्धा

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धेत 5 वी ते 7 वीच्या गटात जिल्हा परिषद शाळा पावशी मिटक्याचीवाडी शाळेच्या प्राची सदानंद सावंत हीने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर रांगोळी स्पर्धेमध्ये 5 वी ते 7 वीच्या गटात जिल्हा परिषद शाळा वाडोस नं 1 चा विद्यार्धी यश मधुकर शिंदे याला पहिला क्रमांक मिळाला आहे.

जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, वकृत्व, निबंध लेखन या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, आरोग्य सभापती अनिषा दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरावर दि. 28 व 29 डिसेंबर 2021 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तालुकास्तरावरील पहिल्या 3 क्रामांकाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहेत.

एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या विविध स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत. रांगोळी स्पर्धा – 5 वी ते 7 वी गट – प्रथम क्रमांक प्राची सदानंद सावंत, जि.प.शाळा पावशी, मिटक्याचीवाडी, कुडाळ, द्वितीय क्रमांक जागृती योगेश पांचाळ, जि.प.शाळा, सांगुळवाडी नं 1, वैभववाडी, तृतीय क्रमांक भार्गवी घनश्याम आळवे, जि.प.शाळा झाराप – कांमळेवीर, कुडाळ.

8 वी ते 10 गट – प्रथम क्रमांक पुर्वा रामदास चांदरकर, माध्यमिक विद्यालय, नेमळे, सावंतवाडी, द्वितीय क्रमांक मनिष रवींद्र मेस्त्री, कलेश्वर हायस्कूल नेरूर, कुडाळ, तृतीय क्रमांक मंथन संजय सुतार, रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी, मालवण.

11 वी ते 12 वी गट – प्रथम क्रमांक मितेश राजेंद्र पाताडे, माध्यमिक विद्यालय कनेडी, कणकवली, द्वितीय क्रमांक प्रसाद राजाभाऊ खोरगाडे, आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी, तृतीय क्रमांक गौरेश शशिकांत राऊळ, खेमराज ज्यू. कॉलेज, बांदा, सावंतवाडी.

चित्रकला स्पर्धा – 5 वी ते 7 वी गट – प्रथम क्रमांक यश मधुकर शिंदे, जि.प.शाळा वाडोस नं 1, कुडाळ, द्वितीय क्रमांक आर्यन सुनिल पवार, विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली, तृतीय क्रमांक आदर्श नंदकुमार चव्हाण, जि.प.शाळा कुसुंबे नं 1, कुडाळ. 8 वी ते 10 वी गट – प्रथम – सर्वेश मधुसुदन खांबल, दोडामार्ग हायस्कूल, दोडामार्ग, द्वितीय – श्रावणी दिनेश मेस्त्री, जांभवडे हायस्कूल, जांभवडे, कुडाळ, तृतीय – तन्मय संजय मुळीक, माध्यमिक विद्यालय, शिवडाव, कणकवली. 11 वी ते 12 वी गट – प्रथम – प्रसाद सुहास कदम, शिरगाव ज्यू. कॉलेज शिरगाव, देवगड, द्वितीय – शेजल महादेव कुबल, दोडामार्ग ज्यू. कॉलेज, दोडामार्ग, तृतीय – ओंकार वसंत हळदणकर पाट ज्यू. कॉलेज, पाट, कुडाळ. निबंध स्पर्धा – गट 5 वी ते 7 वी- प्रथम – श्रेया प्रेमनाथ मांजरेकर, जि.प.शाळा झाराप- कांमळेवीर, कुडाळ, द्वितीय – चिन्मयी जयसिंग खानोलकर, जि.प.शाळा, दोडामार्ग नं 1, दोडामार्ग, तृतीय – प्रथमेश औदुंबर तळेकर, जि.प. शाळा, कुंभवडे नं 1, वैभववाडी. गट 8 वी ते 10 वी – प्रथम – सुहानी सुगंध मोंडकर, पाट हायस्कूल, पाट, कुडाळ, द्वितीय – सोनिया गजानन गवंडळकर, भेडशी हायस्कूल, भेडशी, दोडामार्ग, तृतीय – यशश्री चंद्रकांत केरकर, अणसूर पाल हायस्कूल, अणसूर, वेंगुर्ला. गट – 11 वी ते 12 वी – प्रथम – लक्ष्मी दत्ताराम पारकर, कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, मालवण, द्वितीय – इशा सुधिर पराडकर, कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, मालवण, तृतीय – निष्ठा दिलीप गवंडी, गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, शिरोडा, वेंगुर्ला. वकृत्व स्पर्धा – गट 5 वी ते 7 वी – प्रथम – मैथिली अनंत हुंबळे, जि.प.शाळा आंबोली, नागरतास, सावंतवाडी, द्वितीय – इमाद अन्वर कुरवले, जि.प.शाळा विजयदूर्ग (उर्दु ), देवगड, तृतीय ध्रुवी महेश भाट, वराडकर हायस्कूल, कट्टा, मालवण. गट 8 वी ते 10 वी – प्रथम – श्रेयस श्रीकांत गवस, पिकुळे हायस्कूल, पिकुळे, दोडामार्ग, द्वितीय – श्रद्धा सत्यवान मडव, जांभवडे हायस्कूल, जांभवडे, कुडाळ, तृतीय – दुर्गा नंदकुमार मुणगेकर, नाथ पै ज्ञान प्रबोधनी करुळ, ता. कणकवली. गट 11 वी ते 12 वी – प्रथम – सिद्धी शशिकांत सावंत, ज्यु. कॉलेज, बांदा, सावंतवाडी, द्वितीय – रिद्धी मनोज ओगले, पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड, तृतीय – संस्कृती विजय हरकूळकर, कणकवली कॉलेज, कणकवली. फक्त शिक्षकांसाठीच्या देशभक्तीपर गीत लेखन व गायन स्पर्धा – गट – प्राथमिक शिक्षक – प्रथम – सचिन लक्ष्मण जाधव, जि.प, शाळा, देवगड सडा, देवगड, द्वितीय – सखाराम राघो गुरव, जि.प.शाळा, हिर्लोक नं 1, कुडाळ, तृतीय – योगेश सुधाकर सकपाळ, जि.प.शाळा म्हापण, खवणेश्वर, वेंगुर्ला. गट – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – प्रथम – स्वप्निल श्रीकृष्ण गोरे, मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी, द्वितीय – प्रसाद गजानन शेवडे, शेठ म.ग.हायस्कूल, देवगड, तृतीय नितीन लक्ष्मीकांत धामापूरकर, नेमळे हायस्कूल, नेमळे, सावंतवाडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here