सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 26 हजार 83 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 846 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 116 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 937 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 781 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
तसेच 60 वर्षावरील 1 लाख 29 हजार 98 व्यक्तींनी पहिला डोस तर 82 हजार 916 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 52 हजार 28 नागरिकांनी पहिला डोस तर 93 हजार 177 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 25 हजार 174 जणांनी पहिला डोस तर 89 हजार 669 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 8 हजार 742 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 8 लाख 21 हजार 340 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 6 लाख 29 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 92 हजार 160 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 6 लाख 30 हजार 351 कोविशिल्ड आणि 1 लाख 78 हजार 391 कोवॅक्सिन असे मिळून 8 लाख 8 हजार 742 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 38 हजार 300 लसी उपलब्ध असून त्यापैकी 25 हजार 900 कोविशिल्डच्या आणि 12 हजार 400 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 18 हजार 660 लसी शिल्लक असून त्यापैकी 15 हजार 250 कोविशिल्ड आणि 3 हजार 410 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.