सिंधुदुर्ग:जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजार 136 नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण

0
108

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजार 136 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 188 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 991 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 929 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

तसेच 60 वर्षावरील 1 लाख 32 हजार 489 व्यक्तींनी पहिला डोस तर 98 हजार 446 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 60 हजार 623 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 18 हजार 866नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 44 हजार 178 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 55 हजार 733 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 9 लाख 50 हजार 298 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 10 लाख 60 हजार 500 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 8 लाख 16 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 2 लाख 44 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 7 लाख 51 हजार 726 कोविशिल्ड आणि 1 लाख 98 हजार 572 कोवॅक्सिन असे मिळून 9 लाख 50 हजार 298 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 लाख 38 हजार 190 लसी उपलब्ध असून त्यापैकी 99 हजार 710 कोविशिल्डच्या आणि 38 हजार 480 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 20 हजार 600 लसी शिल्लक असून त्यापैकी 7 हजार 400 कोविशिल्ड आणि 13 हजार 200 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here