ओरोस : पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई- के.वाय.सी.पुर्ण करण्यासाठी दि.31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबद्दलची माहिती पी.एम.किसान योजनेचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली आहे.
सदर ई-के.वाय.सी पुर्ण करण्यासाठी ओटीपी किवा बायोमॅट्रीक हे पर्यांय उपलब्ध करुन दिले आहेत. तरी पात्र लाभार्थींनी ई.के.वाय.सी. प्रमाणीकरण निर्धारित वेळेत पुर्ण करावी, असे आवाहन ही श्री .भडकवाड यांनी केले आहे.


