सिंधुदुर्ग: सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षिणीक वर्षाकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व अर्ज नुतनीकरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज करावीत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर अर्ज व प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.