सिंधुदुर्ग:राष्ट्रीय लोक अदालत ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता

0
99

सिंधुदुर्ग: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार शनिवार, दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबतचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी.म्‍हालटकर यांनी केले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे,धनादेश अनादर,बँककेची कर्ज वसुली, मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन, विद्युत, पाणीदेयक व घरपट्टी, दिवाणी (भाडे,वहिवाटीचे हक्क, मनाई हुकुमाचे दावे इत्यादी ) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी ज्या पक्षकरांची संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन श्री. म्हालटकर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here